Posts

Showing posts from July, 2018

जांभळ्या आठवणी !

Image
                   रणरणत्या मे महिन्यात जीव लाहीलाही होत असतांना गावापासून लांब निघून जावं , हसणारा पळस तुमचा उष्मा घालवायला उभाच असेल, हळू हळू आणखी पुढे सरकाव... अन उंच हिरव्याकंच पानांनी बहरलेल्या झाडाच्या कुशीत शिरून निळी जांभळी झुंबरच झुंबर पाहून सारं-सारं विसरून जावं .          उन्हा पूर्वी फुलणाऱ्या अन रणरणत्या उन्हात फळनाऱ्या ह्या जांभूळ झाडाखाली पाचोळाही गाधी बनून तयार असतो ! त्या पाचोळ्या गाधीवर अलगद पडलेली टपोरी जांभळ उचलावी , जिभेवर ठेवावी अन त्या आगळ्या-वेगळ्या स्वादानं.... माणसाचं हरवलेलं चैतन्य परत यावं ! किती मजेदार नाही ?          पिकलं जांभूळ तोडू नकाsss .. म्हणतानाच मग एकदोन दगड भिरकावायची . आणखी जास्तीची जांभळ जमा झाली की , मग पळस पानांचा पुडा बांधायचा...अंगोपांगी फुलणारा पळस ह्या खेपेस पानं द्यायलाही कचरत असतो , पण त्याने हसून दिलेल्या चार-दोन पानांना जांभळाची चांगली मोठी पाने जोडायची... पुडा हात रूमलात बांधून मनगटाला लटकवायचा , आपला पंधरा शुद्ध रुमाल जांभळ...

माझे हरवलेले बालपण !!

Image
माझे हरवलेले बालपण   आमच्या   बालपणी   3  प्रकारचे   कपडे   होते . एक   शाळेचा •••  दुसरा   घरचा   •••  तिसरा   सणासुदीचा .  ते   देखील   वर्षभर   वापरावे   लागत . अन   आता ? कैज़ुअल ,  फॉर्मल ,  नॉर्मल , स्लीप   वियर ,  स्पोर्ट   वियर ,  पार्टी   वियर , स्विमिंग ,  जोगिंग ,  संगीत   ड्रेस , अमुक  -  तमुक   ••• जिंदगी   सोपी   सुलभ   करायला   निघाले   सारे   पण ती   कापड्यांप्रमाणेच   कॉम्प्लिकेटेड   होऊन   गेलीय ••• त्या   काळी   पैसा   जरूर   कमी   होता   पण   त्या   बालपणात   दम   होता ,  नजाकत   होती ••• आता   हातात   हजारो   रुपयांचे   सेल   फोन   आहेत ,  पण   ती   बालपणाची   मौज   मस्ती ,  दंगा ,  भांडणे ,  रडणे   अन   मनमुराद ...

कविता - चांदणं !!

Image
चांदण्यात न्हायला   माळरानावरच जायला पाहिजे असं नाही ... आसपासच असतं चांदणं   सदोदित ...   पण ते टिपायला टिपकागदा सारखं मन हवं असतं ! असं मन असलं की कविता सुदधा उत्तररात्री ... अगदी रेशीम पावलांनी मनाच्या अंगणात उतरत जाते ... कोजागिरीच्या चांदण्या सारखी !! कवेतली चांदणी आकाशातल्या चंद्राला दाखवत   जगणेच चांदणे होऊन जाते ! हे जगणे पाहून मग गगन निथळते स्वच्छ पणे अन     धराही या आनंदात न्हाऊ लागते !   ते दूध नसते दुधाचे चांदणे असते हवी असते शक्ती त्यात न्हाण्याची अन चांदणे प्राशन करण्याची !                                  ---- पत्रकार धनंजय सोनार                                         ८  नोव्हे १९८८