कविता - चांदणं !!

चांदण्यात न्हायला

 माळरानावरच जायला पाहिजे
असं नाही ...
आसपासच असतं चांदणं
 सदोदित...
 पण ते टिपायला
टिपकागदा सारखं मन हवं असतं !

असं मन असलं
की कविता सुदधा
उत्तररात्री ...
अगदी रेशीम पावलांनी
मनाच्या अंगणात उतरत जाते ...
कोजागिरीच्या चांदण्या सारखी !!

कवेतली चांदणी
आकाशातल्या चंद्राला दाखवत
 जगणेच चांदणे होऊन जाते !

हे जगणे पाहून मग
गगन निथळते स्वच्छ पणे
अन
  धराही या आनंदात न्हाऊ लागते !
 ते दूध नसते
दुधाचे चांदणे असते
हवी असते शक्ती
त्यात न्हाण्याची
अन

चांदणे प्राशन करण्याची !

                                 ---- पत्रकार धनंजय सोनार
                                        ८  नोव्हे १९८८

Comments

Popular posts from this blog

माझे हरवलेले बालपण !!