जांभळ्या आठवणी !
रणरणत्या मे महिन्यात जीव लाहीलाही होत असतांना गावापासून लांब निघून जावं , हसणारा पळस तुमचा उष्मा घालवायला उभाच असेल, हळू हळू आणखी पुढे सरकाव... अन उंच हिरव्याकंच पानांनी बहरलेल्या झाडाच्या कुशीत शिरून निळी जांभळी झुंबरच झुंबर पाहून सारं-सारं विसरून जावं . उन्हा पूर्वी फुलणाऱ्या अन रणरणत्या उन्हात फळनाऱ्या ह्या जांभूळ झाडाखाली पाचोळाही गाधी बनून तयार असतो ! त्या पाचोळ्या गाधीवर अलगद पडलेली टपोरी जांभळ उचलावी , जिभेवर ठेवावी अन त्या आगळ्या-वेगळ्या स्वादानं.... माणसाचं हरवलेलं चैतन्य परत यावं ! किती मजेदार नाही ? पिकलं जांभूळ तोडू नकाsss .. म्हणतानाच मग एकदोन दगड भिरकावायची . आणखी जास्तीची जांभळ जमा झाली की , मग पळस पानांचा पुडा बांधायचा...अंगोपांगी फुलणारा पळस ह्या खेपेस पानं द्यायलाही कचरत असतो , पण त्याने हसून दिलेल्या चार-दोन पानांना जांभळाची चांगली मोठी पाने जोडायची... पुडा हात रूमलात बांधून मनगटाला लटकवायचा , आपला पंधरा शुद्ध रुमाल जांभळ...