Skip to main content
माझे हरवलेले बालपण !!
माझे हरवलेले बालपण
आमच्या बालपणी 3 प्रकारचे कपडे होते.
एक शाळेचा••• दुसरा घरचा ••• तिसरा सणासुदीचा. ते देखील वर्षभर वापरावे लागत.
अन आता?कैज़ुअल, फॉर्मल, नॉर्मल,स्लीप वियर, स्पोर्ट वियर, पार्टी वियर,स्विमिंग, जोगिंग, संगीत ड्रेस,अमुक - तमुक •••
जिंदगी सोपी सुलभ करायला निघाले सारे पण
ती कापड्यांप्रमाणेच कॉम्प्लिकेटेड होऊन गेलीय•••
त्या काळी पैसा जरूर कमी होता पण त्या बालपणात दम होता, नजाकत होती•••
आता हातात हजारो रुपयांचे सेल फोन आहेत, पण ती बालपणाची मौज मस्ती, दंगा, भांडणे, रडणे अन मनमुराद हसणे दुरापास्त झाले आहे.
.ना गैलेक्सी, ना वाडीलाल, ना नैचुरल ठाऊक होत
पण घरी जमवलेले जाडे भरडे आईस्क्रीम खाण्याची मज्जा काही और होती.
दोन चाकी, चारचाकी गाड्या आल्या पण भाड्याने घेऊन चालविलेली सायकल जो आनंद द्यायची ती समाधानाची सफर आजकाल मिळते कुठे?
पावसात मनसोक्त भिजायचं धिंगाणा घालायचा, वाहत्त्या पाण्यात कागदी होड्या सोडायचया, जास्त भिजलो तर आई चे धपाटे पण खायचे, नंतर तीच कुशीत घ्यायची अन गरमा गरम भजी मिळायची.
पाऊस नसला की कागदाचे विमान उडवत आभाळभर संचार केल्याचा आनंद उपभोगत असू. म्हणून म्हणतो
“ कभी हम भी.. बहुत अमीर हुआ करते थे ” “ हमारे भी जहाज.. चला करते थे।”
“ हवा में.. भी।
पानी में.. भी। ”
वर्गात कागदी विमान भिरकावताना नेमके गुरुजींवर आदळले अन मीच क्रश झालो.
एकदा पावसाने जरा विसावा घेतला••• घरी पाहुणे आलेले••• आईने आठाणे (पन्नास पैसे)दिले, दूध आणायला सांगितले•• मी बाहेर वाहत्या पाण्यात नाव सोडली त्यावर आठाणे ठेवले अन नावे बरोबर पैसे बुडाले•• मी देखील••• रिठा लावून धुलाई.
आज त्या दिवसांची आठवण येते तेंव्हा सहज ओठावर गाणे येते••••
वो भी क्या जमाना था !
और..
आज पंधरा वीस हजारचा मोबाइल मुलाने हरवला तर आई सहज म्हणते "काही हरकत नाही बेटा, उद्या 'पप्पा दुसरा आणून देतील!" अन आम्ही पन्नास पैसे हरवले तर यातना भोगल्यात !
काल आणि आज यात तुलना करून कुणाला दूषणे द्यायची नाहीत पण
प्रगतिशील होता होता या चंगळवादी दुनियेत मागे वळून पहाताना आज जरासा भावूक झालो•••अन
कोई लौटा दे.. मेरे बीते हुए दिन।।
म्हणत त्या भाव-भावना कागदावर उतरल्या, इतकेच.
त्याच तुमच्याशी शेअर करतोय••• प्रतिक्रिया दिली तर आनंदच !
-पत्रकार धनंजय सोनार.
अमळनेर , ( ९०७५४९०४८० )
Casino Site - luckyclub.live
ReplyDeleteWith the world's largest selection of slots and video poker machines, Lucky Club offers a wide range of table games and casino games that are Number of Slots: 650,000+Year established: 2014Address: 5201 Isle Ave, Gwen, UK; Phone Number: luckyclub.live 888-226-4434; Email: info@luckyclub.mgmresorts.comCasino · Hotel · Casino · Live Casino
The Best Slots Sites for 2021
ReplyDeleteThe Best Online Slots Sites — The Best Slots Sites for 포커 카드 2021 · 파워 볼 검증 사이트 1. Red Dog – $500 Bonus 크롬번역기 + 100 올인구조대 Free Spins · 2. Raging Bull – 100 Free Spins · 3. mBit Casino – 100 Free mlb 분석 Spins